मराठवाडा

पुण्यातील नामांकित शाळेत वर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग!

Share Now

पुणे: येथील परिसरातील एका नामांकित शाळेतील वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाण्यात शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( )

वाचा:

हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत एका विद्यार्थिनीने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार शिक्षक याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने विद्यार्थिनीला मोबाइल देऊन तिच्याशी जवळीक साधली. तसेच, शाळेत देखील विविध कारणे काढून तो विद्यार्थिनीला बोलवून अंगास स्पर्श करत होता. मुलीने हा प्रकार आता कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

वाचा:

हडपसर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संजय साळुंके या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने इतरही विद्यार्थिनींच्या अंगाला हात लावून त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले का, याचा तपासही हडपसर पोलीस करत आहेत. याप्रकरणी अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vKNGHj
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!