मराठवाडा

मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित

Share Now

मुंबई: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारच्या आत नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ५५४ नवीन बाधितांची भर पडली असून मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी २ हजार ६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. ( )

वाचा:

क्षेत्रात एप्रिल महिन्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दैनंदिन रुग्णसंख्येने ११ हजारांपर्यंतचा टप्पा गाठला होता. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. ही स्थिती आता वेगाने सुधारू लागली आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा:

मुंबईत आज करोनाचे २ हजार ५५४ नवीन रुग्ण आढळले तर त्याचवेळी ५ हजार २४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. मुंबईत आज एकूण २९ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या २४ तासांत मुंबईत ६२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत १३ हजार ४७० रुग्ण दगावले आहेत. मुंबईत सध्या करोनाचे ५१ हजार ३८० अॅक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले आहे. मुंबईत सध्या कोविड वाढीचा दर ०.५८ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ११६ दिवसांवर गेला आहे. सध्या चाळीमध्ये आणि झोपडपट्टीत ९८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ७५३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनीही दिली. त्यात मुंबई आणि या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b0U0ma
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!