मराठवाडा

पेट्रोलच्या दराची शंभरी; रोहित पवारांनी लोकांना विचारला ‘हा’ प्रश्न

Share Now

अहमदनगर: पेट्रोल-डिझेलची दरवाढ सातत्यानं सुरूच असून या दरवाढीवरून विरोधकही केंद्र सरकारवर टीका करत आहेत. पेट्रोलचे दर आता प्रति लिटर १०० रुपयांच्या पार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी एक हटके ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ताज्या दरवाढीचा संदर्भ देत त्यांनी लोकांनाच एक प्रश्न विचारला आहे. (NCP MLA Tweet on )

वाचा:

‘क्रिकेटमध्ये शतक झालं की आपण टाळ्या वाजवून खेळाडूचं अभिनंदन करतो. एखाद्यानं वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही अभिनंदन करतो. आता पेट्रोलच्या दरानंही शंभरी ओलांडली आहे. या दरवाढीचं करायचं काय?,’ अशी विचारणा त्यांनी केली आहे. ‘कमेंटमध्ये तुम्हीच सांगा,’ असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

वाचा:

याआधी पश्चिम बंगालसह पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतरही रोहित पवार यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलं आहे’, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर खरोखरच दरवाढ झाली होती. तब्बल ६६ दिवसांनंतर देशात इंधनाची दरवाढ झाली होती. पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैसे प्रति लिटर महागले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी पुन्हा ट्विट करून ‘भीती अखेर खरी ठरली,’ असं म्हटलं होतं. आता पेट्रोलचे दर शंभर पार गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर उपरोधिक टीका केली आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y4jkkQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!