देशविदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मुंबई विदर्भ

तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन.सी.सी छात्रसैनिकांचे प्रमाणपत्र परीक्षेत यश

Share Now

तुळजापूर,दि१४ (प्रतिनिधी)
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील एन.सी.सी विभागातील छात्रसैनिकांनी सी व बी प्रमाणपत्र परीक्षेत मोठे यश संपादन केले.संरक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या मार्फत फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एन.सी.सी सी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये सार्जंट मंगेश अण्णा कुंभार,कार्पोरल आकाशसिंग संतोषसिंग बायस बी ग्रेड व लान्स कार्पोरल अविनाश जनार्धन कानडे, ऋषिकेश बाजीराव यादव,ज्यूनि.अंडर अॉफिसर दयानंद सुभाष कानडे,राम दत्तात्रय म्हेत्रे सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.सदर परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला असून या छात्रसैनिकांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच ५३ महाराष्ट्र एन.सी.सी बटालियन लातूर यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एन.सी.सी बी प्रमाणपत्र परीक्षेत १४ छात्र उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या यशस्वी छात्रसैनिकांचे ५३ महाराष्ट्र एन.सी.सी बटालियन लातूर चे कमांडींग अॉफिसर कर्नल सुनील अब्राहम,अॅडम अॉफिसर कर्नल देवेशह बहुखंडी,एन.सी.सी अॉफिसर प्रा.मेजर डॉ.वाय.ए.डोके, सुभेदार मेजर दिपक कुमार, सुभेदार पांडुरंग बोरे,ना.सुभेदार भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या छात्रसैनिकांच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार सांळुखे,सचिवा प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ युवराज भोसले, सहसचिव अर्थ प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ, महाविद्यालतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

Share Now
error: Content is protected !!