अनिक आणि पर्याय परिवाराकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी.
कळंब -दि. 14 एप्रिल 2023 रोजी अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. आणि पर्याय सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट कळंब च्या हसेगाव के., पारा आणि भूम येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, हसेगाव के. येथील मुख्य कार्यालयात ऑपरेशन हेड विलास गोडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी शाखा व्यवस्थापक भिकाजी जाधव, क्षेत्राधिकारी आश्रुबा गायकवाड, मुख्य लेखापाल विकास कुदळे, रियाज शेख, संगीता अंकुश आदी उपस्थित होते, पारा ता. वाशी येथील ऑफिस मध्ये व्यवस्थापक बालाजी शेंडगे, क्षेत्राधिकारी उषा मस्तूद, राहुल शेलवते, जयश्री कोठावळे, प्रमिला राख, जनाबाई शिकेतोड आदी उपस्थित होते, तसेच भूम येथील ऑफिस मध्ये शाखाधिकारी अतुल चिलवंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करन्यात आले यावेळी क्षेत्राधिकारी मनोज क्षीरसागर, सुरज भालेराव, सुस्मिता भांडवलकर आदी उपस्थित होते

Comments are closed.