पर्याय व महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने 10 वी,12 वी आणि पदवीधर महिलांसाठी स्वयंरोजगार, आणी उद्योग व्यवसाय माहिती मार्गदर्शन मेळावा…

आजच्या युगामध्ये महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत…. चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन उद्योग, व्यवसाय नोकरी, करण्याची क्षमता ग्रामीण महिलां मध्ये सुद्धा आहे… उद्योग व्यवसाय रोजगार मिळवून सक्षमपणे आपल्या कुटुंबाला चालवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे…
केवळ माहितीचा अभाव असल्याकारणाने अनेक महिलांना आपली क्षमता असून चांगले शिक्षण असून सुद्धा.. कोणता रोजगार निवडावा कोणता उद्योग व्यवसाय करावा कोणत्या प्रकारचं काम करावं याबद्दलच योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे…

ही बाब लक्षात घेऊन पर्याय संस्थेने सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय माहिती मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे…

या मेळाव्यातून महिलांचे शिक्षण आणि शिक्षणाला अनुरूप कोणता उद्योग,व्यवसाय, निवडता येईल,.. बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती कशी साध्य करता येईल सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेता येईल… याविषयीचे सविस्तर माहिती मार्गदर्शन मेळाव्यामध्ये महिलांना दिले जाणार आहे..

तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थित राहून आपली आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी उत्तम उद्योग व्यवसाय रोजगार निवडण्याची साठीच मार्गदर्शन घ्यावे….
विविध क्षेत्रातले.. तज्ञ आणि मार्गदर्शक मेळाव्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

ज्या महिलांना या मेळाव्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी उपस्थित राहण्याच्या संबंधाने अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे….
आपली नाव नोंदणी करण्यासाठी.. श्री. विलास गोडगे यांना 8669137443, 9823775999 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा…

असे आवाहन पर्यास संस्थेचे सचिव मा. विश्वनाथअण्णा तोडकर यांनी केले आहे.

मेळावा ठिकाण व वेळ
29 एप्रिल 2023 मेळाव्याची वेळ.. सकाळी 11 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत.

मेळाव्याचे ठिकाण पर्याय संस्था हसेगाव( केज ) कळंब येरमाळा रस्ता तालुका कळंब जिल्हा धाराशिव

Comments are closed.