योगाने शरीर व मन तंदुरस्त राहते, प्रत्येकाने योगाचे धडे घ्यावेत – आशिष झाडकेयोगशिक्षक आशिष झाडके व सौ. शिवानी झाडके यांनी चार महिन्यांपासून विविध गावांना दिले योगाचे धडे

2 Min Read

कळंब (प्रतिनिधी) येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा (ता. कळंब) व आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगाव (ता. बार्शी) येथे गेल्या पाच वर्षापासून योग तसेच नृत्य, नाट्य, संगीत प्रशिक्षण देणारे योगशिक्षक आशिष निवृत्ती झाडके व सौ. शिवानी आशिष झाडके यांच्या नेतृत्वात 22 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत विविध गावांमध्ये योग शिबिरे घेण्यात आली. या शिबीरातून आशिष झाडके यांनी योगाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने योगाचे धडे घ्यावेत. योगामुळे शरिर आणि मन दोन्ही तंदुरस्त राहतात, असे विचार आशिष झाडके यांनी ठिकठिकाणच्या योग शिबिरातून उपस्थितांसमोर मांडले.


शिराढोण आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या उपकेंद्र पिंपरी (शि), वाटवडा, पाडोळी, घारगाव, जायफळ, कोथळा, हासेगाव(शि),लोहटा पूर्व.व प्रा.आ.केंद्र ईटकूर अंतर्गत उपकेंद्र हासेगाव(के),आंदोरा,वाकडी,पाथर्डी या गावात आशिष झाडके यांनी तर योगशिक्षिका शिवानी आशिष झाडके यांनी प्रा.आ.केंद्र मंगरूळ अतंर्गत उपकेंद्र भाटशिरपूरा, जवळा(खु),गोविंदपूर, देवळाली, गोरगाव प्रा. आ. केंद्र मोहामधील गावे मोहा उपकेंद्र खामसवाडी, बोर्डा, मस्सा येथील ग्रामस्थांना योगाचे धडे दिले. ठिकठिकाणच्या योग शिबिरादरम्यान योगशिक्षिका शिवानी आशिष झाडके यांनी प्रेगनंट असतानाही योग शिबिरे घेत योगामुळे पोटातील बाळासोबतच आईचे आरोग्य निरोगी ठेवता येते असा संदेश दिला.
या योग शिबिरासाठी संकेत गवई, डॉ. प्रेमचंद जैन व प्रा. पिराजी नरवाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा आयुष अधिकारी गजानन परळीकर, आरोग्यवर्धिनी कार्यक्रम समन्वयक डॉ. पल्लवी धनके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. एम. सय्यद, सांख्यिकी अनवेक्षक जालिंदर माळी, तालुका लेखापाल सुरज जमादार,प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी शिराढोण,ईटकुर,मोहा,मंगरूळ आदींची उपस्थिती होती.चालू आर्थिक वर्षामध्ये आरोग्य वर्धनीकेंद्र व उपकेंद्र येथे योग सत्र देण्यात यावे.


योगशिक्षक आशिष झाडके हे येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा (ता. कळंब) व आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगाव (ता. बार्शी) येथे गेल्या पाच वर्षापासून योग तसेच नृत्य, नाट्य, संगीत याचे प्रशिक्षण देतात. यासाठी आशिष झाडके यांना शास्त्रीय नृत्य मध्ये प्रा. सोमेश्री पवार यांच्यासह व्यसनमुक्ती केंद्रचे संचालक डॉ. संदिप तांबारे व डॉ. पल्लवी तांबारे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. याशिवाय आशिष झाडके हे कळंब शहरामध्ये शास्त्रीय नृत्य, तबला, योगा व महिलांसाठी योगा व झुंबा क्लास घेतात.

Share This Article