RBI Cancels Licence Today : आरबीआयने देशातील 5 सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई

2 Min Read

RBI

 

RBI खरे तर देशातील सर्व बँकांवर आरबीआयचा कमांड असतो. आरबीआयच्या नियमांचे ज्या बँका पालन करत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. कित्येकदा तर नियमांचे पालन न करणाऱ्या बँकेचे लायसन्स देखील रद्द केले जाते. गेल्या काही महिन्यात आरबीआयने अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द झाले आहे.

अशातच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. बोटाद पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या बँकेचे लायसन रद्द झाले असल्याने आता या सहकारी बँकेला बिगर बँकिंग संस्था म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

RBI Cancels Licence Today

RBI ने याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केला आहे. यात म्हटले आहे की, RBI ने 17 फेब्रुवारी 1998 रोजी बोटाड पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला भारतात बँकिंग व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेली लायसन्स 29 डिसेंबर 2023 ला रद्द करण्यात आले आहे. याशिवाय आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांना मोठा दंड ठोठावला आहे.

या 5 बँकांना मोठा दंड ठोठावला आहे :-

RBI ने 28 डिसेंबर 2023 रोजी देशातील पाच सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याबद्दल पाच सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये विद्यानंद सहकारी बँक, श्री चैतन्य सहकारी बँक, पंचशील मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, सरदारगंज मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक आणि द युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे.

RBI ने हे देखील म्हटले आहे की, बोटाद पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. बँकेच्या ग्राहकांच्या जमा रकमेची आरबीआय हमी घेतो. ग्राहकांना त्यांची पैसा परत मिळणार याची खात्री असावी.

- Advertisement -

Share This Article