Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra: नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी पेट्रोल डिझेल कंपनीचे ट्रकचालक आजपासून संपावर

1 Min Read

Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra: ट्रक चालकांचा संप

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे.

Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra

Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra: पेट्रोल-डिझेल पुरवठा ठप्प

बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेल पंपांवर टँकर न पोहोचल्याने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलसाठी मोठी रांगा लावावी लागत आहे.

- Advertisement -

 

Truck Driver Strike

Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra: नवीन कायद्याची कडक तरतूद

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे. तसे न केल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Truck Driver Strike, Petrol Pump Shutdown Maharashtra: ट्रक चालकांची नाराजी

- Advertisement -

या कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांमध्ये नाराजी आहे. त्यांनी सरकारला या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा संपाचा कालावधी वाढवण्याचा इशारा ट्रक चालक संघटनांकडून देण्यात आला आहे.

Share This Article