कर्मयोगी अनिताताई विश्वनाथ तोडकर यांचा महाराष्ट्र लोक विकास मंच या संघटने कडून विशेष सत्कार

2 Min Read

आयुष्यातील गेली 40 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्र लोकविकास मंच नेटवर्क सोबत काम करणारे कार्यकर्ते, महिला राजसत्ता आंदोलना सोबत, पर्याय संस्थेसोबत काम करणारे कार्यकर्ते यांची आई होण्याचे भाग्य, कर्मयोगी होण्याचे भाग्य, अनिता विश्वनाथ तोडकर यांना मिळालं. एकूण उभ्या आयुष्यामध्ये किमान साडेतीन लाख कार्यकर्त्यांना, निवासाची सोय करणे, भोजनाची सोय करणे, आजार पाणी याची सोय व्यवस्था करणे, अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रवासाची सोय करणे, कोविड 19, भूकंप, दुष्काळ ,अशा महामारी मध्ये समाजातील उपेक्षित लोकांना सहाय्य करने ही सर्व कामे आईच्या पात्रात उभा राहून त्यांनी केलेली आहेत.

 

कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने जेऊ घातल्याची नोंद महाराष्ट्र लोकविकास मंच यांनी घेतली. सामाजिक बदलासाठी,सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची आई या पात्रात उभा राहून त्यांनी अहोरात्र काम केलं. म्हणून आज महाराष्ट्र लोक विकास मंच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने अनिताताई विश्वनाथ तोडकर यांचा सत्कार कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी राज्य कार्यकारणीच्या कार्यशाळेमध्ये करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ (आणा) तोडकर, उपाध्यक्ष एम एन कोंढाळकर सर, संघटक सूर्यकांत बापू, सचिव भूमिपुत्र वाघ, खजिनदार मनीषाताई घुले, बापू आंबटकर विदर्भ विभाग प्रमुख, ओम गिरी मराठवाडा प्रमुख, बाजीराव ढाकणे बीड जिल्हा प्रमुख,पुष्कराज तायडे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, रविभाऊ आदरकर पुणे, बाजीराव ढाकणे बीड जिल्हा प्रमुख, बालाजी शिंदे लातूर जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

 

- Advertisement -

सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले तर आभार कोंडाळकर एम एन सर आणि रमाकांत बापू यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ऋषिकेश तोडकर आणि विकास कुदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article