महाराष्ट्र

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील जयविलास पॅलेसमध्ये दरोडा

Share Now


ग्वाल्हेर – भाजप खासदार आणि ग्वाल्हेरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजमहालात दरोडा पडल्याचे समोर आले आहे. काही दरोडेखोर मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये घुसले होते. या वृत्ताला स्थानिक पोलिसांनी दुजोरा दिला असून महालामधील राणी महालमध्ये दरोडेखोरांनी घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्निफर डॉगही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महालात नेमके किती दरोडेखोर शिरले होते आणि काय सामान चोरी गेले याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत. ग्वाल्हेरचे शहर पोलीस अधिक्षक रतनेश तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बरेच नुकसान केले आहे. याप्रकरणी महालामधील कर्मचाऱ्यांचीदेखील पोलीस चौकशी करत आहेत.

The post ज्योतिरादित्य शिंदेंच्या ग्वाल्हेरमधील जयविलास पॅलेसमध्ये दरोडा appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/38RYrP2
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!