एकल महिलांना पर्याय संस्थेकडून बी-बियाणे वाटप
कळंब – तालुक्यातील मौ. हसेगाव के. येथील पर्याय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि फिनोलेक्स पाईप व मुकुल माधव फाउंडेशन पुणे यांच्या मदतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम, परांडा या तालुक्यातील 424 विधवा, परितक्ता, एकल महिलांना सोयाबीन आणि उडीद बियाणांचे वाटप दि.09 आणि 10 जून रोजी करण्यात आले, गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडपने राबवला जात असून आतापर्यंत एक कोटी रुपयाच्या बियाणांचे वाटप केले आहे, या बियानांचे वाटप पर्याय संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर, कळंबचे कृषी अधिकारी संतोष हुरगट, मुकुल माधव फाउंडेशन चे बबलू मोकळे, फिनोलेक्स पाईप चे विक्री प्रतिनिधी अमोल ठाकरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तोडकर, अनिक फायनान्स कंपनीचे मोहीम प्रमुख विलास गोडगे, तेजश्री भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले, गेल्या तीस वर्षापासून पर्याय संस्था वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने दुष्काळ निर्मूलन, एकल महिलांचे संघटन आणि पुनर्वसन, अनिक च्या माध्यमातून महिला बचत गट संघटन, ग्रामीण महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्ष्मीकरण, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना कमी व्याजदराचे अर्थ सहाय्य यासारखे विविध उपक्रम राबवत आहे, बियाणे वाटपाचा कार्यकम यशस्वी करण्यासाठी पर्याय आणि अनिक परिवाराचे सौ.अनिताताई तोडकर, सुनंदा खराटे, अतुल चिलवंत, विकास कुदळे, अशोक शिंदे, रामलिंग स्वामी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.
Comments are closed.