सातबारा मागण्यासाठी गायनधारकानी आझाद मैदान येथे आंदोलनात सहभागी व्हावे- रमेश भिसे

3 Min Read

केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब कष्टकरी भूमिहीन दलित आदिवासी समाजातील लोकांनी आपली व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी कित्येक वर्षापासून आपापल्या गावातील गायरान पडीक जमिनी वरती वहिवाटी करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. तसेच राहण्यासाठी ही जागा नसल्याने गायरान पडीक जमिनी सह वनीकरण व गावठाण जागेमध्ये झोपड्या व घरे बांधून राहत आहेत. मात्र शासकीय अधिका- न्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजी पणामुळे तसेच शासनाच्या प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यामुळे अद्याप पर्यंत भूमीहीन शेतमजुराला गायरान जमिनीचा पट्टा मिळाला नाही, अथवा राहते घराची जागा त्याच्या मालकीची झाली नाही. अनेक वेळेला तालुका जिल्हा पातळीवरती अर्ज
करून धरणे उपोषणे आंदोलने करूनही दखल घेतली नाही. म्हणून गायरान जमिनीचा सातबारा मागणीसाठी व राहत्या घराच्या जागेची मालकी मागणीसाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था संघटना समविचारी लोक यांना सोबत घेऊन गायरान जमीन बचाव संघर्ष समिती जमीन अधिकार आदोलन समाज जागृती संघटना या सर्वांच्या वतीने (दि. २०) मार्च ला आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व गायनधारकांचा भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे.

या मोर्चात आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

१) गायरान जमीन नियमानुकुल करण्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करून गायरान जमीन अतिक्रमण कब्जेदार वहितीदाराच्या मालकीच्या करून जमिनीचे सातबारे उतारे पती-पत्नीच्या संयुक्त नावे देण्यात यावेत

२) दलित वंचित उपेक्षित आदिवासी भूमिहीन घटकातील अतिक्रमणधारकांना जमिनीचा कायमस्वरूपी ताबा देऊन या जमिनीचा महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून विकास करण्यात यावा

- Advertisement -

३) महाराष्ट्र राज्य सरकारने अतिक्रमित वहीती आणि निवासी जमिनीबद्दल वस्तुस्थिती अहवाल माननीय उच्च न्यायालयाला सादर करून
वंचित उपेक्षित दलित आदिवासी भटके समाजातील गोरगरिबांना जमिनीच्या हक्का पासून वंचित करणार नाही याचं लेखी निवेदन माननीय उच्च
न्यायालयाला सादर करावे

४) कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमित गायरान वहितीधारकांना जमिनीवरून निष्काशीत करण्यात येणार नाही याबद्दलची हमी
सरकारने द्यावी

५) मागील चार पिढ्यापासून पाच लाख कुटुंबातील अतिक्रमित गायरान जमीन आणि वन जमीन चा सातबारा तातडीने विनाअट देण्यात यावा
तसेच २५/ लाख निवासी अतिक्रमणधारकांना सरकारने विनाअट राहत्या घराची मालकी हक्क द्यावा

६) महाराष्ट्र राज्य सरकारने तमाम महाराष्ट्रातील दलित भूमी कष्टकरी उपेक्षित आदिवासी भटके वंचित समाजाला जमिनीचा मालकी हक्क देऊन खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्याची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी

वरील मागणीसाठी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व गायनधारकानी सहभागी व्हावे असे आवाहन जमीन अधिकारांदोलन व समाज जागृती संघटनेच्या वतीने रमेश भिसे, बाबा पोटभरे उत्तम गायकवाड मच्छिंद्र लांडगे, अशोक बिक्कड सह सर्व कार्यकर्त्यांनी केलेले आहे.

- Advertisement -

Share This Article